Ad will apear here
Next
‘क्षत्रिय मराठा मंडळा’तर्फे शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा
रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यातील काही क्षणचित्रे. (छायाचित्र- माउली फोटो, रत्नागिरी)

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त क्षत्रिय मराठा मंडळातर्फे २३ मार्च २०१९ रोजी सायंकाळी रत्नागिरी शहरात क्षत्रिय मराठा मंडळातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे झेंडे आणि पारंपरिक वेशभूषेतील हजारो मराठा मंडळींनी यात सहभाग घेतला. ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, घोडेस्वार बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मूर्तीने या यात्रेची शोभा वाढवली.



शोभायात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शनिवारी सायंकाळी मंडळाच्या सिद्धीविनायक रेसिडेन्सी येथील कार्यालयातून दुचाकी फेरी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरात नेण्यात आली. भगवती मंदिरामध्ये श्री भगवतीदेवीचे आशीर्वाद घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर ती जयस्तंभ येथे आणण्यात आली. येथे पालखीतील श्री शिवरायांच्या मूर्तीची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवे फेटे, नऊवारी साड्या, पांढरा झब्बा-लेंगा अशा पारंपरिक वेशभूषेत मराठा समाजातील मंडळी उपस्थित होते. लहान मुलेसुद्धा फेटा व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली.



शोभायात्रा नीटनेटकी, नेत्रदीपक आणि भव्यदिव्य स्वरूपात निघण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी नियोजन केले. या शोभायात्रेत क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्यासह मंडळाचे राजाराम साळवी, दिवाकर साळवी, सतीश साळवी, संतोष तावडे, संदीप मगदूम, उर्मिला घोसाळकर, प्राची शिंदे, शुभांगी इंदुलकर, कोमल तावडे, संध्या मोरे आदींसह सर्व पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZLSBY
Similar Posts
रत्नागिरीत महिला संमेलन उत्साहात रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शहरातील अंबर हॉलमध्ये महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात समाजातील दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.
रत्नागिरी लायनेस क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित रत्नागिरी : लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीने २०१८-१९ या वर्षासाठी विविध समाजोपयोगी कार्य करून प्रांतात आपले नाव उंचावले असून, कोल्हापूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रांताच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीने विविध पुरस्कार पटकावले आहेत.
रत्नागिरी ग्राहक पेठेच्या दीपावली प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी : सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठेअंतर्गत आयोजित केलेल्या महिला बचत गट व उद्योगिनींच्या उत्पादनांच्या दीपावली प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजिका शीलावती तावडे यांच्या हस्ते झाले. रत्नागिरीतील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेने सभागृह भारावले दापोली : ‘आदरणीय अण्णा! आम्ही तुमचे सागरपुत्र आणि कोकणकन्या आज या समारंभातून तुमचं आमच्यावर असलेलं मोठं ऋण अंशतः फेडत आहोत. आम्हाला काहीसं ऋणमुक्त होऊ द्या. तुमचं ध्येय, स्वप्न होतं सागरपुत्र विद्याविकास संस्था. तुम्ही सर्वस्व ओतलंत त्यासाठी...!’ अशा आशयाच्या कृतज्ञता पत्राचे वाचन व्यासपीठावरून सुरू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language